भाजप चक्काजाम आंदोलन करणार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचया निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि माजी मंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारला हा इशारा देतानाच येत्या २६ जूनला राज्यभरात भाजप चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणाही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.
क्लिक करा आणि वाचा-
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता राज्यातील विविध भागांमधील जनतेशी संवाद साधणार आहे. तसेच विविध संघटनांच्या नेत्यांशीही ते संवाद साधणार आहेत. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून येत्या २६ जूनला ओबीसी समाज रस्त्यावर उतणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत. जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आम्ही मोर्चे काढले नाहीत. कारण आम्ही त्यावेळी लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या भूमिकेत होतो. तेव्हा आमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता होती. पण आता मात्र सरकारचे मंत्रीच रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत, आंदोलन करण्याचे बोलत आहेत, अशा शब्दांत मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
बावनकुळेंनीही साधला निशाणा
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही एका महिन्यात डेटा तयार करू असे एकीकडे ओबीसी मंत्री सांगत आहेत, तर दुसरीकडे ते केंद्र सरकारवर ढकलण्याचे काम करतात असे सांगत हे सरकार नौटंकी करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times