मुंबई : मान्सून दाखल झाल्यापासून राज्याभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरापर्यंत धुवांधार पाऊस सुरू आहे. आताही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, गोवा या जिल्ह्यांना पुढच्या 3, ४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचे अधिकारी
यांनी यासंंबंधी ट्वीट करत माहिती दिली आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आणि दुकांनामध्ये पाणी शिरलं आहे. अशात आता मुंबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अधिक माहितीनुसार, मुंबईसह सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट यांसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात धुवांधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातही अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि नागपूरमध्ये मुसळधार पाऊस असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर तर गरज नसल्याच घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनचा प्रवास रेंगाळला आहे. राज्यात कोकण, गोवा, विदर्भात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे; पण शहरी भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होते आहे. मध्य महाराष्ट्रात बुधवारी महाबळेश्वरमध्ये ४५ मिलिमीटर, कोल्हापूरमध्ये १८, साताऱ्यात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here