कोल्हापूर: सन २०२१ च्या दिवाळीची पहिली आंघोळ कोल्हापूर शहरवासीयांना थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालू, असे वचन ग्रामविकास मंत्री (Hasan Mushrif) यांनी यापूर्वी दिले होते. परंतु, या योजनेच्या अपुऱ्या कामामुळे वचनाची पूर्तता होत नसल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहरवासियांची जाहीर माफी मागितली. करोना महामारीची परिस्थिती व तांत्रिक अडचणीमुळे ही योजना अपुरी असल्याचा खुलासाही मुश्रीफ यांनी बैठकीत केला. (minister publicly apologized to the people of )

मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे काळम्मवाडी धरणाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर शहरातील जनतेला शुध्द, मुबलक आणि थेट पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने काळम्मवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. मात्र मे २०२२ अखेर कोल्हापूर वासियांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी, अशा निसंदिग्ध शब्दात यांनी ग्वाही दिली.

क्लिक करा आणि वाचा-
व्यासपीठावर जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आर. के. पवार उपस्थित होते.

मुश्रीफ पुढे म्हणाले, शहराला थेट पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. सुमारे ४५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतुद करण्यात आली असून या कामाकरिता निधीची अजिबात कमतरता जाणवणार नाही. जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असे ठेकेदाराला निर्देश देवून श्री. मुश्रीफ यांनी २०२२ साली येणारी दिपावली तमाम कोल्हापूरवासियांच्या जीवनात आनंद निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर २०२१ च्या दिपावली सणामध्ये आपण कोल्हापूर वासियांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करु शकलो नसल्याबद्दल शहरवासियांची क्षमा मागितली. लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
या योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे ९५ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तसेच कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे केवळ तीन किलो मीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पुर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आतापर्यंत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक श्रीमती बलकवडे यांनी दिली. तर हर्षजीत घाटगे यांनी या योजनेचे सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here