मुंबई : अभिनेता शेखर सुमनच्या आईचे निधन झाले आहे. खुद्द शेखर सुमननेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही माहिती देताना शेखर सुमनने एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

काय लिहिले आहे शेखरनेशेखर सुमनने लिहिले आहे, ‘माझी प्रिय आई जिने माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले तिचे निधन झाले आहे. तिच्या जाण्यामुळे अनाथ आणि उद्धवस्त झाल्याची भावना निर्माण झाली आहे. ती माझ्यासोबत कायम होती…त्याबद्दल आईचे मनापासून आभार.. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तू माझ्या आठवणीत राहणार आहेस. तू आम्हाला दिलेल्या आशिर्वादासाठी आभार…’

अध्ययन सुमननेही लिहिली पोस्ट
शेखर सुमनचा मुलगा अध्ययनने देखील आपल्या आजीच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे, ‘आमची प्रेमळ आजी आता शांत झाली आहे. तू खूप कणखर होती. शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या आजाराशी लढत होती. तिच्यासाठी प्रार्थना…’ काही दिवसांपूर्वी शेखर सुमनच्या आईचे किडनी ट्रान्सप्लान्टचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. तेव्हा देखील शेखरने सोशल मीडियाद्वारे आपल्या आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी, असे आवाहन केले होते.

काही दिवसांपू्र्वी अध्ययनने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘ अनेक लोकांना माहिती नाही की मी दर बुधवारी मंदिरात जातो आणि गणपतीची आराधना करतो आणि चांगल्या प्रकृतीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करतो. अनेक वर्षे देवाने माझ्यावर कृपा केली होती. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या आजीसाठी देवाकडे प्रार्थना करा.’

दरम्यान, गेल्यावर्षी करोनामुळे शेखर सुमनच्या सासूचे निधन झाले होते. आता या वर्षी त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे तो खूपच दुःखी झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here