भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने काल गुरुवारी छापे घालून १२ संशयितांना अटक केली आहे. या संशयितांनी ठेवीदारांकडून ३० टक्के रक्कम देवून घेतलेल्या पावत्यांच्या साह्याने कर्जफेड केल्याचा ठपका आहे. अश्याच प्रकारे मॅचिंग पावत्यांनी कर्जफेड करणाऱ्या आणखी ५६ मातब्बरांची यादी गुन्हेशाखेने तयार केल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. दरम्यान या प्रकरणी आज पुणे न्यायालयात अटकेतील ९ जणांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ( a list of 56 more debtors with matching receipts has been prepared)
महाराष्ट्रभर गाजलेल्या बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील गुन्ह्याच्या तपासात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ पथकांनी काल गुरुवारी पहाटे राज्यभरात एकाच वेळी छापे घालून १२ संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांनी बीएचआर पतसंस्थेतून मोठे कर्ज घेतले. त्यानतंर त्यांनी ठेवीदारांकडून स्वत: कींवा एजंट नेमून ठेवी मिळणार नाही, अशी भीती घालून अवघ्या ३० टक्के कींमतीत ठेव पावत्या घेतल्या. आणि त्याच पावत्यांच्या आधारे कर्जफेड केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अटक केलेल्या या सर्व मात्तबरांनी पतसंस्थेतून मोठमोठे कर्ज घेतले होते.
क्लिक करा आणि वाचा-
अश्याच प्रकारे ठेव पावत्यांचे मॅचिंग करुन आणखी मोठ्या ५६ कर्जदारांनी कर्जफेड केल्याचे तपासात समोर येत आहे. त्यांची यादी देखील पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तयार केली आहे. त्यामुळे पुढील तपासात या ५६ कर्जदारांवर देखील चौकशी अथवा कारवाईचा फेरा येण्याची शक्यता आहे. बीएचआर पतसंस्था ही मल्टीस्टेट असल्याने या कर्जदारांमध्येही राज्यभरातील मात्तबरांचा समावेश आहे.
काल तिघांना सहा दिवसांची कोठडी
बीएचआर घोटाळ्यात काल पहाटे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ संशयिताना ताब्यात घेतले होते. त्यातील अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोकटा या तिघांना पुणे न्यायालयात हजर केले असता या तिघांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
क्लिक करा आणि वाचा-
आज ९ जणांना पाच दिवसांची कोठडी
आज भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) यांना
पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठंडी सुनावली.
क्लिक करा आणि वाचा-
कोठडीसाठी सरकारी वकीलांचा युक्तिवाद
पुणे न्यायालयात संशयितांना हजर केल्यानंतर सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी तिघांना पोलिस कोठडी मिळावी म्हणून प्रभावी युक्तिवाद केला. अॅड. चव्हाण यांनी मुद्दे मांडले की,
घोटाळा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या सर्व संशयितांनी स्वत: कींवा एंजट नेमून ठेवीदारांना पैसे बुडतील अशी भीती घालून ३० टक्क्याप्रमाणे पावत्या विकत घेतल्या. बीएचआर पतसंस्थेत विशिष्ट प्रकारे संगनमत करून घोटाळा करण्यात आला आहे. या पावत्या मॅचिंग प्रकरामुळे ठेवीदारांची मोठी फसवणुक झाल्याचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times