मैदानात पाऊस पडत असल्याने त्याबाबतचे अपडेट्स मिळत होते. सामना कधी सुरु होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण त्यावेळी भारतीय संघ मात्र पेव्हेलियनमध्ये नेमका काय करत होता, हे कोणालाच समजले नव्हते. पण आता याबाबतचा एक व्हिडीओ आला आहे. चाहत्यांना या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाऊस पडत असताना भारतीय संघातील काही सदस्य दडपण कमी करण्यासाठी काही गेम्स खेळत होते. यामध्ये भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आणि वृद्धिमान साहाबरोबर संघातील काही सदस्य होते. यावेळी दडपण कमी करण्यासाठी हे सर्व खेळ खेळत होते. आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या खेळावर असेल. कारण आजचा पूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आता उद्या किती षटकांचा खेळ होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times