सिंधुदुर्गमधील कोविड-१९ हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आपण करोनाला नक्कीच पराभूत करू असा विश्वास पवार यांनी दिला. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील लोक, डॉक्टर, नर्सेस यांना सहकार्य करणारे, ऑक्सिजन निर्मिती करणारे लोक यांच्या प्रयत्नांमुळे आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो. सामुदायिक प्रयत्नातून आपण यश मिळवू अशी खात्री बाळगत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. आपले विचार त्यांनी ट्विटही केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने मंजूर केलेल्या निधीतून येथे कोविड-१९ हेल्थ केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून समाधान वाटल्याचेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
आधीही नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मुंबईतील सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणार्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आठवड्याभराच्या काळात म्हाडाच्या १०० सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या, याचीही पवार यांनी आठवण करून दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times