वाचा:
महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार आहेत तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
वाचा:
महापालिका आयुक्त यांनी आज याबाबत आदेश जारी केला आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असणार आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर वैध कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही किंवा फिरताही येणार नाही. पुणे महापालिका हद्द, पुणे कँटॉनमेंट बोर्ड आणि खडकी कँटॉनमेंट बोर्ड या संपूर्ण भागासाठी हे आदेश लागू असणार आहेत.
वाचा:
नेमका आदेश काय आहे?
– जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहतील.
– इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार व रविवार बंद राहणार.
– रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ग्राहकांसाठी शनिवार-रविवार बंद राहतील. केवळ पार्सल सेवेची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल देता येईल.
– रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.
– वीकेंड वगळता अन्य दिवशी मॉल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवता येतील.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times