राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आज शुक्रवारी जळगावात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपच्या ७२ नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही ? त्यावेळी पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे असे सांगणारार एकच बाप होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. याबाबत गिरीश महाजन यांनी बोलावे असे आव्हान गुलाबराव पाटील दिले.
क्लिक करा आणि वाचा-
चित्रा वाघांची सर्कशीतल्या वाघासारखी टीका
पुढे बोलतांना गुलाबराव पाटलांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला, शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा नजराणा म्हणून आणले होते, तेव्हा अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर राहिलो असतो, असे छत्रपतींनी सांगितले होते. त्या महाराजांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. त्यामुळे चित्रा वाघांनी सर्कशीतल्या वाघासारखं ज्या लोकांच्या बाबतीत टीका केली आहे, त्या भगिनीला माझी विनंती आहे. कोणत्याही भगिनीवर शिवसैनिक वार करणार नाहीत. जो गोंधळ झाला, तेव्हा शिवसेनेकडूनही महिला होत्या आणि भाजपकडूनही महिला होत्या. भगिनींना पाहून हल्ला झाला, असे नाही. मी या प्रकाराला मान्यता देऊ शकत नाही’, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
तर प्रायचित्त भोगावेच लागेल
बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आता कारवाई सुरू आहे, त्यावर बोलणे उचित होणार नाही. पण ज्यांनी चुकीचे काम केलंय, त्यांना चुकीच्या कामाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल. चौकशी होऊ द्या, जे दोषी असतील ते समोर येतील, असेही शेवटी गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times