डोंबिवली: डोंबिवलीतील एका केमिकल कंपनीला आज, मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. त्यानंतर एकापाठोपाठ स्फोट झाले. त्यामुळं आग अधिकच भडकली. त्यामुळं परिसरात घबराट पसरली.

डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सुरुवातीला आगीची तीव्रता कमी होती. मात्र, त्यानंतर एकापाठोपाठ एक स्फोट होऊ लागले. स्फोटांच्या आवाजानं परिसरात घबराट पसरली. काही वेळानं आग अधिकच भडकली. त्यामुळं या कंपनीसह आसपासच्या कंपनीतील कर्मचारी सुरक्षित ठिकाणी गेले. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही, असं सांगितलं जात आहे. आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप कळू शकले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here