अकोला: जिल्हा परिषदेमध्ये खांदेपालट होण्याची चर्चा एप्रिल महिन्यापासून सुरू होती. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा असलेल्या यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे १७ जुन रोजी दिला असुन हि बाब १८ जुनला समोर आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्हा परिषद मध्ये जवळपास गेल्या २०-२५ वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ-वंचित बहुजन आघाडीची एकहाती सत्ता आहे. जानेवारी २०२० ला झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याने जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन करण्यात आली. भांबेरी सर्कल मधुन निवडुन आलेल्या प्रतिभाताई भोजने या जि.प.अध्यक्ष पदी १८ जानेवारी २०२० रोजी विराजमान झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक वेळा पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्याने गेल्या एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद मध्ये खांदेपालट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी आपल्या पदाचा राजीनामा १७ जुन रोजी अखेर सादर केला आहे. शुक्रवारी ही माहिती समोर जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या भुमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असुन ते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः

३० वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात

अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने या भारिप बहुजन महासंघ- वंचित बहुजन आघाडीमध्ये जवळपास गेल्या ३० वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी पक्षाच्या महिला आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भांबेरी सर्कल मधुन त्यांनी पहिल्यांदा निवडणुक लढविली असुन त्या मोठ्या मताधिक्याने निवडुनसुद्धा आल्या आहेत. त्यामुळेच त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर वर्णी लागली होती. मात्र आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याने त्यांची ३० वर्षांपासूनची पक्षनिष्ठा संपुष्टात तर आली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचाः

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here