मुंबईः ‘शिवसेना येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारणातही सक्रीय राहणार आहे. त्यामुळंच आगामी काळात देशाच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिवसेनेचा विचार महत्त्वाचा राहणार आहे,’ असे संकेत नेते यांनी दिले आहेत.

शिवसेना आज ५५वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यानिमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ‘शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा लोकं म्हणत होते की शिवसेना मुंबई- ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करुन दिल्लीपर्यंत पोहोचली,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या ओळी शिवसेनेच्या भविष्यासाठीच लिहल्या असाव्यात,’ असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः

‘शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरुप नष्ट झाले. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली. त्यामुळं शिवसेनेची पाळंमुळं आजही खोल रुजली आहेत. हिंदुत्वासाठी आजही शिवेसेनाच समोर येते. आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरच पुढे जातेय,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘मराठी माणसाचा विषय शिवसेनेने दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते,’ असा ठाम विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here