नवी दिल्ली: भारताचे महान धावपटू यांचे शुक्रवारी रात्री चंदिगड येथे निधन झाले. महिन्यापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. ते ९१ वर्षांचे होते. वेगवान धावपटू मिल्खा यांना असे ही म्हटले जात होते. हे नाव त्यांना त्याच्या वेगवान धावण्यामुळे मिळाले असेल तरी या मागे एक रंजक अशी स्टोरी आहे.

वाचा-

मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख म्हटले जात असे. पण हे नाव त्यांना कसे पडले यामागे आहे पाकिस्तान कनेक्शन…

मिल्खा यांनी १९५९च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. स्वतंत्र भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते. त्यानंतर १९६०च्या रोम ऑलिंपिकमध्ये मिल्खा यांचे पदक अगदी किरकोळ अंतराने हुकले. यामुळे ते निराश होते. त्यानंतर १९६० सालीच मिल्खा यांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आमंत्रण दिले. मिल्खा यांच्या मनात फाळणीचे दुख: होते. यामुळेच ते यास्पर्धेला जाणार नव्हते. पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समझावल्यानंतर मिल्खा यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

वाचा-

पाकिस्तानमध्ये तेव्हा अब्दुल खालिक या धावपटूची खुप चर्चा होती. ते पाकिस्तानचे अव्वल धावपटू होते. या स्पर्धेत मिल्खा आणि खालिक यांची रेस झाली आणि त्यात मिल्खा यांनी खालिक यांचा पराभव केला. पाकिस्तानमधील स्टेडियममध्ये सर्व चाहते खालिक यांचा उत्साह वाढवत होते आणि तेव्हा मिल्खा यांनी खालिक यांचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान यांनी मिल्खा यांना फ्लाइग सिख असे नाव दिले.

वाचा-
..

आज तु धावला नाहीस तर हवेत उडत होतास. म्हणूनच आम्ही तुला फ्लाइंग सिख असा किताब देतो. त्यानंतर मिल्खा यांना द फ्लाइंग सिख असे म्हटले जाऊ लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here