खासदार संजय राऊत आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त विचार व्यक्त करत होते. त्यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसाबाबत विचारले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेस पक्षाची बांधणी अधिक वेगाने होवो आणि देशाच्या राजकारणातील त्यांचे स्थान बळकट होवो, असा शब्दात संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा देताना म्हटलेआहे. राहुल गांधी हे अतिशय प्रमाणिक असे नेतृत्व आहे. राहुल गांधी यांच्या मनात देशाच्याप्रती सच्ची भावना आहे. येणाऱ्या काळात ते अतिशय मजबुतीने पुढे जावोत. देशात काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होवो, असेही राऊत पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
हिंदुत्व म्हटले की शिवसेना- संजय राऊत
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या आज साजरा होणाऱ्या वर्धापनदिनानिमित्त देखील भाष्य केले. शिवसेनेच्या आधी आलेले आणि नंतर आलेले राजकीय पक्ष हे काळाच्या ओघात नष्ट झालेले आपण पाहिले आहेत. शिवसेना मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आजही पुढे जात आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीच दूर होऊ दिला नाही, हेच कारण आहे की ज्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना ही आपली आहे असे वाटते. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत. आज हिंदुत्व म्हटले की शिवसेना, अशा शब्दांत राऊत यांनी शिवसेनेबाबत गौरवोद्गार काढले.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times