नागपूर: राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असले तरी देखील काँग्रेस पक्ष अधूनमधून आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले आहे. यावेळी पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाही सांगितला. (ncp leader says no vacancy for cm post in maharashtra)

लोकशाहीमध्ये कोणालाही मुख्यमंत्री होता येते. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असतो तो मुख्यमंत्री होतो. सध्या महाविकास आघाडीकडे बहुमत असून आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. हे पाहता आता मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे.

निवडणुकीला अजून अवकाश आहे. त्या अगोदरच अशा प्रकारचे भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोलाही पटेल यांनी लगावला आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र वाचून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे निवडणुकीबाबतचा निर्णय हा २०२३ मध्ये होईल असे म्हणत आहेत. त्यामुळे या विषयावर आताच बोलणे योग्य असणार नाही, असे पटेल पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही आताच भाष्य करणे बरोबर नसल्याचे पटेल म्हणाले. या बरोबरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय असल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोगी यांची बंद खोलीत भेट घेतली होती. यावरही पटेल यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांनी चर्चा करणे यात काही गैर आहे असे आपल्याला वाटत नसल्याचे पटेल म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here