नितेश राणे यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘शिव प्रसाद काय असतो… ते संजय राऊतांनी… आमदार वैभव नाईकना विचारावा… पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी… पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये…टेस्ट आवडेल नक्की.’
क्लिक करा आणि वाचा- नीलेश राणे यांचाही वैभव नाईकांवर निशाणा
आज शिवसेनेचा वर्धापन दिवस. आज शिवसेना काहीतरी चांगलं काम करेल असं वाटत होते. मात्र शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना आमच्या पेट्रोलपंपावरून उधारीचे पेट्रोल हवे होते. त्यांनी कोणतीतरी स्कीम राबवली होती. मात्र त्यांनी आमची एनओसी न घेताच त्यांनी उधारीचे पेट्रोल मागायला आले होते. मात्र आमच्या लोकांनी त्यांना तेथून हाकलून लावले. आता आपल्याला मारहाण होईल हे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी तेथून काढता पाय घेतला.
क्लिक करा आणि वाचा-
वैभव नाईक यांना पेट्रोल हवे होते तर ते त्यांनी आमच्याकडे रितसर मागायला हवे होते. जिल्ह्यामध्ये यांना कोणी उधारी देणार नाही याची त्यांना कल्पना आहे. केवळ राणेच देऊ शकतात हे माहीत असल्यानेच ते कदाचित आमच्या पेट्रोलपंपावर आले असावेत. आम्ही जिल्ह्यात नव्हतो. नाहीतर शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तर उधारी दिली असती. अशा दरिद्रींना आम्ही कधी मनात आले तर देत असतो, अशी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
वैभव नाईक यांचा पुढील निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. खरे काम करायला हिम्मत नाही. तुम्ही सरकारच्या पैशावर आणि उद्धव ठाकरे यांनी फेकलेल्या तुकड्यांवर एक आमदार आहात. राणे यांच्याशिवाय तुमचे जीवन नाही. तुम्ही शिवसैनिक म्हणून जिवंत नाही आहात, तर राणे विरोधक आहात म्हणून तुमची ओळख आहे, अशा शब्दांत नीलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times