मुंबईः महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाचा हा आजचा दुसराच वर्धापन दिन आहे. करोनाचे संकट असल्याने मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत समाज माध्यमांद्वारे संवाद साधत आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात करोनाच्या संकटाबरोबरच अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलत आहेत हे जाणून घेण्यासाठी लाइव्ह अपडेटशी जोडलेले राहा…
Live अपडेट…
>>
(क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी)
>> दादर येथील भवनाजवळ भाजप कार्यकर्ते विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष पाहायला मिळाला. याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
>> आजच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>> करोनाचे संकट असल्याने या वर्षी वर्धापन दिनाचा सोहळा व्हच्युअल स्वरुपात साजरा होत आहे.
>> शिवसेनेचा आजचाशिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होत आहे.
>> १९ जून २०२१ या दिवशी शिवसेना या राजकीय पक्षाचा ५५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times