साउदम्प्टन: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहलीने दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावावर केले.

वाचा-

विराटने भारताकडून सर्वाधिक कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला. याबाबत विराटने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मागे टाकला. धोनीने ६० सामन्यात देशाचे नेतृत्व केले. WTC फायनल ही विराटची ६१वी कसोटी ठरली आहे. विराटने गेल्या ६० सामन्यात विराटने ३६ सामन्यात विजय मिळवून दिलाय. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील आहे.

वाचा-

या शिवाय विराटने आणखी एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धेच्या फायनल सामन्यात खेळणारा विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

विराटच्या या विक्रमाची सुरुवात २०११ साली झाली होती. तेव्हा धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्डकपची फायनल विराट खेळला होता. तेव्हा भारताने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर दोन वर्षांनी भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या सामन्यात विराटने भारताकडून सर्वाधिक ४३ धावा केल्या होत्या.

त्यानंतर २०१४ साली धोनीच्या नेतृत्वाखाली विराटने टी-२० वर्ल्डकपची फायनल खेळली होती. तेव्हा भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाला होता. त्या सामन्यात विराटने ५८ चेंडूत ७७ धावा केल्या होत्या. पण टीम इंडियाला १३४ धावांचा बचाव करता आला नाही. या लढतीनंतर धोनीने संघाचे नेतृत्व सोडले होते आणि विराट कर्णधार झाला.

वाचा-

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली होती. पण पाकिस्तानने भारताचा पराभव केला. भारताकडून आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचा विक्रम आतापर्यंत धोनी आणि विराटच्या नावावर होता. पण आज धोनीला मागे टाकत विराटने आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचा मान मिळवला.

या शिवाय विराटने २००८ साली १९ वर्षाखालील वर्ल्डकमध्ये संघाचे नेतृत्व केले होते आणि भारताला विजय मिळून दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here