साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने सर्व क्रिकेट चाहते नाराज झाले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या महालढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. अखेर आज दुसऱ्या दिवशी वरुण राजाने विश्रांती घेतल्यामुळे सामन्याला सुरूवात झाली. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वाचा-

भारतीय संघाची फलंदाजी सुरू असून कर्णधार आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या मैदानात आहेत. अशातच सोशल मीडियावर भारतीय संघातील एका खेळाडूच्या पत्नीने शेअर केलेला फोटो व्हायरल होत आहे.

वाचा-

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने इस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना ती म्हणजे, बेडरुमच्या बाल्कनीतून टॉस पाहत आहे. अनुष्काने बाल्कनीतून फोटो काढला असून ज्यात विराट आणि केन टॉस करताना दिसत आहेत. अनुष्काचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-

याआधी काल (शुक्रवारी) साउदम्प्टन येथे पाऊस पडत असताना अनुष्काने अशीच एक स्टोरी पोस्ट केली होती ज्यात तिने पावसाला पाच दिवसांनी येण्यास म्हटले होते.

वाचा-

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहीलने सर्वाधिक कसोटी सामन्यात देशाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला. विराटने धोनीच्या ६० कसोटी सामन्याचा विक्रम मागे टाकला. त्याच बरोबर आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१४, टी-२० वर्ल्डकप २०१४ आणि २०१७ साली पुन्हा एकाद चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली होती. या शिवाय विराटने २००८ साली १९ वर्षाखालील वर्ल्डक फायनलमध्ये संघाचे नेतृत्व केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here