मुंबई: काळात नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. घरात बसून राज्याचा कारभार हाकणारा असा मुख्यमंत्री आजवर महाराष्ट्राने पाहिला नाही, असे टोमणे मारले जात आहेत. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ( )

वाचा:

करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. संचारबंदी, जमावबंदी, यासारखे निर्णय घेताना मुख्यमंत्री ठाकरे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. करोना संसर्गाच्या दोन लाटांचा महाराष्ट्राने समर्थपणे मुकाबला केला. या आधारावर अनेक सर्वेक्षणांत मुख्यमंत्री ठाकरे यांची लोकप्रियता अधोरेखित झाली आहे. त्यातच धारावी मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेने केलेले कौतुक असेल वा मुंबई महापालिकेने करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या नियोजनाचे सुप्रीम कोर्टाकडून झालेले कौतुक असेल, महाराष्ट्राचा करोना विरोधी लढा लक्षवेधी ठरला आहे. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला.

वाचा:

मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत, असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी जोरदार टोला हाणला. करोनाकाळात सरकारने जे काही काम केले, त्याचे जे कौतुक होत आहे वा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण याबाबत जे सर्वेक्षणाचे अहवाल येत आहेत, ते काही मी करायला सांगितलेले नाहीत. मी कुठे पळायला वा मॅरेथॉनलाही गेलेलो नाही. तेव्हा तुम्हीच काय तो बोध घ्या. मी घराबाहेर न पडता जर इतकं काम होत असेल तर घराबाहेर पडल्यास काय होईल, याचा अंदाज करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकांना घरात राहा म्हणून सांगायचे आणि मी बाहेर फिरायचे हे काही योग्य नाही. कोविडचे नियम हे सर्वांसाठी आहेत, असे नमूद करत त्यांनी घरातून कारभार हाकण्यामागचे कारणही स्पष्ट केले. करोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या प्रशासनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

करोना मुक्ती हा एक उपक्रम न राहता चळवळ निर्माण व्हायला हवी. कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. करोनातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत यात सहभागी होत नाही तोपर्यंत हे कठीण नाही तर अशक्य आहे, असे नमूद करत प्रत्येकाने आपल्या घरापासून हा लढा दिला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here