येथील एका १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून मंगळवारी सकाळी हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. धीरेनभाई चंद्रकांत शहा असे ६१ वर्षीय हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.
नेपयन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेनभाई आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. कार्यालय असलेल्या ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर या इमारतीच्या थेट गच्चीवर गेले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली. उडी मारल्यानंतर शहा जागीच मरण पावले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.
वाचा:
शहा यांच्या कार्यालयातील टेबलावर पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. ‘माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये,’ असं त्यात म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं. दादासाहेब भडकमकर (डीबी) मार्ग पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
वाचा:
शहा यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्याला असून तिथं राहूनच कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times