मुंबई: राज्यात आजही नवीन बाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. गेल्या २४ तासांत ८ हजार ९१२ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी १० हजार ३७३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. ( )

वाचा:

राज्यात सध्या प्रक्रिया सुरू आहे. आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारवर दर आठवड्याला जिल्हे व महापालिका क्षेत्रांचे स्तर जाहीर केले जात आहेत व त्यानुसार निर्बंध शिथील वा कडक केले जात आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच करोनाचा ग्राफ सातत्याने खाली येत असल्याने खूप मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील प्रमुख महानगरांत स्थिती सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. गेल्या २४ तासांतील करोनाची आकडेवारी पाहिल्यास करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी राहिल्याने अॅक्टिव्ह रुग्णाची संख्याही खूप खाली आली आहे. राज्यात सध्या करोनाचे १ लाख ३२ हजार ५९७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक १८ हजार ७८८ रुग्ण महापालिका क्षेत्रात आहेत तर पुणे जिल्ह्यात १८ हजार १०८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १३ हजार ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात ही रुग्णसंख्या १० हजार ८५९ पर्यंत खाली आली आहे.

वाचा:

अशी आहे २४ तासांतील स्थिती

– राज्यात आज २५७ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा.
– आज राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांचे निदान. आज १०,३७३ रुग्ण बरे होऊन घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण ५७,१०,३५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
– रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६% एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here