सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या वर्धापन दिनी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या पेट्रोलपंपावर राडा घातला. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता पोलिसांनी मोठी कारवाई केली असल्याची माहिती हाती येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आणि भाजपचा कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून बेकायदा जमाव केला, इतकेच नाही तर आरोग्य आणि जीवितास धोका निर्माण केल्यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर तर भाजपच्या दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शकर कोरे यांना भारत पेट्रोल पंपावर धक्काबुकीं केली होती. सरकारी कामात अडथळा आणला. तसेच राज्यात कोरोना संक्रमण काळ सुरू असताना भारत पेट्रोल पंपवर आमदार वैभव नाईकांसह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते बरोबर ५० ते ६० कार्यकर्ते यांनी आदोलन केले. त्यामळे या सर्वांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी कुडाळ अध्यक्ष विनायक राणे यांनी कुडाळ पोलिसांत निवेदनाद्वारे केली होती. यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होतं. भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याना प्रत्येकी १ लिटर प्रेट्रोल मोफत देण्यात येणार होत कुडाळमधील भारत पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यावरून भाजप व सेना यांच्यात राडा झाला होता. तत्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करीत यावर नियंत्रण मिळवले. या वादामुळे शिवसेना भाजप वाद पुन्हा जिल्ह्यात उफळण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here