मुंबई: ‘राममंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवणे ही राजनिष्ठा आहे. महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक बजबजपुरी, आरोग्यविषयक अराजक माजले असतानाही अशा सरकारची पाठराखण करणारे राजनिष्ठच ठरतात. राष्ट्र संकटात असतानाही जे फक्त राजनिष्ठ म्हणून वावरतात त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका आहे,’ असा इशारा शिवसेनेचे खासदार (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

सरकारच्या धोरणांवर टीका केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या नताशा नरवाल, देवांगना कलिता व लक्षद्वीप येथील आयश सुलताना ह्यांची न्यायालयानं नुकतीच सुटका केली. त्यावेळी न्यायालयानं सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याच अनुषंगानं संजय राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखातून देशात वाढत चालेल्या स्वामीनिष्ठेवर टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर सत्ताधारी भापजनं जी भूमिका घेतली आहे, त्याकडंही राऊत यांनी लक्ष वेधलं आहे.

वाचा:

‘राममंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा असल्याचं संजय सिंह यांनी समोर आणलं. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत, त्यांना हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळ्यांची चौकशी करा असे सांगणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘कोणत्याही सरकारच्या ‘चुका’ दाखवणे हा काही राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ठरू शकत नाही. आंदोलनात भाग घेऊन सरकारविरुद्ध घोषणा देणे, त्याबद्दल राजद्रोह, दहशतवादासारखी कलमे लावून बेमुदत तुरुंगात टाकणे या ‘राजनिष्ठेला’च कोणी राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती समजत असतील तर देश संकटात आहे. अनेकदा शत्रूविरुद्ध लढणे सोपे असते. पण राजनिष्ठांच्या मूर्ख फौजांविरुद्ध मुकाबला करण्याइतकी अवघड गोष्ट नाही,’ अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here