पुणे : भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बचावात्मक भूमिका घेतली. कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर नेत्यांचा काही दोष नाही. प्रत्येक वेळी टीका करायला पाहिजे असे नाही. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाईन दाखवले तर गर्दी होणार नाही. अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अनुयायांनी अडचणीत आणू नये, अशा शब्दांत पाटील यांनी पवार यांचा बचाव करून गर्दीचे खापर कार्यकर्ते आणि नागरिकांवर फोडले.

राजकीय परिणामांची काळजी न करताही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत असे वाटते याचे मला विशेष वाटते. पण अठरा महिन्यात हिंदुत्वापासून कसे बाजूला गेलात, महाशिवआघाडीची महाविकास आघाडी कशी झाली, अशी टीका पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

दरम्यान, नागरिकांनो गर्दी करू नका, अशी सतत तंबी देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गर्दी झालेल्या सभेला संबोधित करण्याची वेळ शनिवारी आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुरक्षित वावराचा फज्जा उडाला. ‘कार्यकर्त्यांनी आणि पदाधिऱ्यांनी उत्साहापोटी नियमावलीचे पालन केले नाही, ही खंत माझ्या मनात आहे,’ अशी मखलाशी अजित पवार यांनी केली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर मांडव टाकून सार्वजनिक सभा घेतलीच का, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here