मुंबई: शिवसेनेचे आमदार () यांनी मुख्यमंत्री () यांना पत्र लिहून पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू असलेला शिवसेनेचा विश्वासघात व केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिला जाणारा त्रास ही कारणं सरनाईक यांनी यासाठी दिलेली आहेत. त्यांच्या या पत्रामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार () यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:

संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे? ते पत्रं खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणं गरजेचं आहे’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘टॉप्स सेक्युरिटी’ घोटाळ्याच्या प्रकरणात प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते कायदेशीर लढाई लढत आहेत. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी याबाबतचा उल्लेख प्रामुख्यानं केला आहे. ‘कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल असलेल्या माजी खासदाराकडून बदनामी सुरू आहे. आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका प्रकरणातून सुटल्यानंतर जाणीवपूर्वक दुसऱ्या प्रकरणात गुंतवलं जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या प्रकरणात अडकवलं जात आहे. भाजपशी जुळवून घेतल्यास हे कुठेतरी थांबेल, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. सरनाईक यांच्या पत्रातील याच मुद्द्याला धरून संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यापेक्षा अधिक काही बोलण्यासारखं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here