मुंबई: शिवसेनेचे आमदार यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेलं पत्र समोर आल्यामुळं राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अजूनही उत्तम संबंध आहेत. ते तुटण्याआधी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. सरनाईक यांच्या भूमिकेवर सर्वच पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षानं या निमित्तानं संधी साधत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला साद घातली आहे.

वाचा:

‘सरनाईक यांच्या मतावर आम्ही बोलणं बरोबर नाही’ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपलं मत बोलून दाखवलं आहे. ‘प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते, आमदार आहेत. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केलीय. उद्धवजींनी त्यावर विचार केला तर आमचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत विचार करतील,’ असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

वाचा:

‘सरनाईक यांनी आता जी मागणी केलीय, तेच आम्ही १९ महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेनं जाऊ नये. ही आघाडी अनैतिक आहे असं आमचं म्हणणं होतं. अल्पसंख्याकांचं लांगूलचालन हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बेसिक थिअरी आहे. शिवसेनेचा त्याला विरोध होता. त्यावरच शिवसेना वाढलीय. सरनाईक यांनी हेच सांगितलंय. त्यांनी व्यक्त केलेलं मत ही सच्चा शिवसैनिकाची भावना आहे. पण तेच आम्ही सांगितलं तर आमच्यावर टीका होते,’ असं पाटील म्हणाले.

काँग्रेस म्हणते…

प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ‘तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळं काँग्रेसनं त्यावर मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here