अहमदनगर: भाजपचे आमदार () यांनी मतदारसंघात ओबीसी आरक्षण जनजागृती म्हणून बहुजन समाज संवाद उपक्रमांतर्गत घोंगडी बैठका घेतल्या. त्याद्वारे राष्ट्रवादीचे आमदार आणि एकूणच पवार कुटुंबीयांवर टीका केली. पडळकर यांची ही मोर्चेबांधणी ओबीसी आणि भाजपसाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी याच मतदारसंघातील माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रा. () यांना धक्का पोहचविणारी मानली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या जास्त असलेल्या या मतदारसंघात पडळकरांनी लक्ष घातल्याचे दिसत असल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत.

वाचा:

ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील नेते रान पेटवत आहेत. त्यात पडळकर यांचाही समावेश आहे. मात्र, पडळकर हे पवारांचे कट्टर विरोधक आणि कडक शब्दांत टीका करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांनी रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये समाजाच्या जागृतीसाठी बैठका घेतल्या. त्यातूनही त्यांनी पवारांवर टीका केली. ‘आमदार झाल्यापासून रोहित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत, ते उठसूट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करतात. रोहित पवार केवळ पोस्टर बॉय आहेत. ते केवळ सोशल मीडियावर सक्रिय असतात, प्रत्यक्षात काम नाही, शिंदेच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत, त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून निकृष्ट मालाचा पुरवठा केला जात आहे.’ अशी टीका पडळकर यांनी ठिकठिकाणच्या बैठकांमधून केली.

वाचा:

त्यांना पवार यांनीही उत्तर दिले. ‘आपण स्वत: सामान्य कार्यकर्ता असून कधीही मुख्यमंत्री म्हणवून घेतले नाही. पडळकर यांना पवार कुटुंबीयांवर टीका करण्यासाठीच आमदारकी मिळाली असून त्यांनी कधी विकास कामांवरही बोलावे,’ असे उत्तर पवार यांनी दिले. अर्थात पडळकर यासाठी राज्यभर फिरत आहेत. ओबीसी विशेषत: धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या भागात त्यांचा भर आहे. त्याच उद्देशाने ते कर्जत-जामखेडमध्ये आले होते. असे असले तरी याकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येऊ लागले आहे. या मतदारासंघाचे माजी आमदार, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे हेही ओबीसींचे नेते आहेत. तीन वेळा ते या मतदारसंघाचे आमदार होते. पवार यांनीच गेल्या वेळी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. काही दिवसांपूर्वी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची चर्चा सुरू झाली होती. त्याचे शिंदे यांनी खंडणही केले होते. या पार्श्वभूमीवर पडळकर यांच्या शिंदेच्या मतदारसंघातील दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. पक्षासाठी आणि ओबीसींसाठी दौरा असेल तर दोन्ही नेते एकत्र आले असते तर अधिक परिणाम साधता आला असता. एकट्या पडळकरांनीच दौरा करून या भागातील ओबीसी, पूर्वी शिंदे यांच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते, मतदार यांना आपलेसे करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? ही भविष्यातील वेगळी मोर्चेबांधणी तर नाही ना? असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here