सांगलीः शिवसेनेचे आमदार (pratap sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान मोदी व भाजपशी पुन्हा जुळवून घ्या अशी विनंती पत्रात केली आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले काँग्रेस- राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांच्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे. (jayant patil on )

प्रताप सरनाईक यांनी १० जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहलं होतं. सरनाईक यांच्या लेटरहेडवरील १० जूनचं पत्र एका वृत्तवाहिनीनं ट्विट केलं आहे. या पत्रात त्यांनी ‘सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे, असं म्हटलं आहे. सरनाईक यांच्या या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देत सरनाईकांच्या पत्रामुळं राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कोणत्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

वाचाः

‘मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कोणी गेलंय, असं आता काही झालेलं नाही. त्यामुळं अशापद्धतीने कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईल, असं वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहलं आहे त्यांच्या मतदारसंघात असं काही झालं आहे का तपासून पाहावं लागेल,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी सरनाईकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

वाचाः

प्रताप सरनाईकांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर काय आरोप केलेत?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री व सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्राशी नकळत छुपी हातमिळवणी करताना दिसत आहेत. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. तसं झाल्यास निदान माझ्यासह अनिल परब आणि रवींद्र वायकर अशा इतर सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल,’ असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

वाचाः

गेल्या दीड वर्षात मी आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीच कामे कशी झटपट होतात, आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही? अशी त्यांची भावना आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का? अशी चर्चा सुरू असल्याकडंही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here