मुंबईः मुंबईभोवती असलेला करोना संसर्गाचा विळखा आता सैल होऊ लागला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. आज मुंबईत ७३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १९ जणांनी प्राण गमावले आहेत. (coronavirus in mumbai)

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईला मोठा फटका बसला होता. दैनंदिन करोना रुग्णसंख्या १० हजारांपर्यंत गेली होती. मात्र, जून महिन्यापासून रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे.

वाचाः

मुंबईत गेल्या २४ तासांत ७३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. व आज दिवसभरात ६५० रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनामुळं जीव गमावलेल्या रुग्णाची संख्या १९ झाली आहे. मुंबईत एकूण १५ हजार २९८ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १४ हजार ८०९ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रिकव्हरी रेट ९५ टक्के इतका झाला आहे. व रुग्ण दुप्पटीचा दर आता ७२६ दिवसांवर पोहोचला आहे.

वाचाः

मुंबईत आज करोनाच्या २८ हजार २२६ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या १५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८० इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here