साउदम्प्टन: भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघाची गोलंदाजी सुरु झाली तेव्ही एक मोठी चुक केली. या चुकीमुळेच भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला लवकर विकेट्स मिळू शकल्या नाहीत आणि त्याचेही हेच कारण असल्याचे आता पुढे आले आहे. कारण न्यूझीलंडने चहापानापर्यंत एकही विकेट गमावलेली नाही आणि त्यांची बिनबाद ३६ अशी स्थिती आहे.

कोहलीने कोणती मोठी चुक केली, पाहा…इंग्लंडमध्ये गोलंदाजीची सुरुवात करणे हे सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण तुमच्या संघातील लवकर विकेट मिळवणारा गोलंदाज कोण आहे, त्याला प्रत्येक कर्णधार प्राधान्य देत असतो. पण कोहलीने ही गोष्ट करतानाच मोठी चुक केली. भारतीय संघात सध्याच्या घडीला दोन्ही स्विंगसह वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू मोहम्मद शमी आहे. पण कोहलीने यावेळी गोलंदाजीची सुरुवात इशातं शर्मा आण जसप्रीत बुमरा यांच्याकडून केली. यावेळी इशांतने गोलंदाजी करताना ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकले, त्यामुळे त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले. पण त्यावेळी जर शमीच्या हाती चेंडू दिला असता तर भारतीय संघाला लवकर विकेट मिळवण्याची दाट शक्यता होती. कारण शमी हा फलंदाजानुसार गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो फलंदाजाच्या शरीराच्या जवळ जास्त गोलंदाजी करतो आणि त्यावेळी विकेट मिळण्याची जास्त संधी असते. हे सर्व समीकरण पाहता कोहलीने आपल्या गोलंदाजीची सुरुवात शमीकडून करायला हवी होती, जर तसे झाले असते तर कदाचित आताचे चित्र वेगळे असले असते.

न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावाची सावध सुरुवात केली असली तरी त्यांनी एकही विकेट गमावलेली नाही. त्यामुळे या गोष्टीच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ आता मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने कुच करू शकतो. त्यामुळे भारतीय कर्णधार कोहलीने गोलंदाजी करताना जी चुक केली, ती भारतीय संघाला आता चांगलीच महागात पडू शकते, असे दिसत आहे. त्यामुळे आता चहापानानंतर कोहली कोणच्या गोलंदाजाकडून सुरुवात करतो, हे पाहणे महत्वाचे असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here