मुंबईः महाराष्ट्रात आज ९ हजार ३६१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत ९ हजार १०१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही आकडेवारी जारी केली आहे. ()

राज्यात आज करोनारुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ६० ते ७० हजारांच्या घरात पोहोचलेली रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. लसीकरण मोहिमेचा वेग, लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळं रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

आज राज्यात ९ हजार १०१ रुग्णांनी करोनावर मात केली असून एकूण ५७ लाख १९ हजार ४५७ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. ७६ टक्के इतका झाला आहे. तर, आज राज्यात ९ हजार ३६१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. करोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत असल्यानं दिलासा मिळतोय.

वाचाः
गेल्या २४ तासांत १९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर १. ९७ टक्के इतका झाला आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत १ लाख १७ हजार ९६१ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी अजूनही करोना मृतांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

वाचाः

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

राज्यात सध्या १ लाख ३२ हजार २४१ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ चाचण्यांपैकी ५९ लाख ७२ हजार ७८१ नुमने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ व्यक्ती होमक्वारंटाइमध्ये आहेत तर ४ हजार ६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here