साउदम्प्टन: आर. अश्विन हा भारताचा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला आहे. कारण भारताला मिळवलेली एकमेव विकेट अश्विनने मिळवून दिली आहे. पण त्याचबरोबर अश्विनने यावेळी निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

फायनलमध्ये अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अश्विनने यावेळी निवृत्तीबाबत सांगितले की, ” मी गोलंदाजीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. नवीन गोष्टी करायला मला नेहमीच आवडते. त्यामुळे मी गोलंदाजीमध्ये प्रयोग करत असते आणि माझी गोलंदाजी अचूक कशी होईल, हे करण्याचा मी प्रयत्न करत असतो. पण जेव्हा मी माझ्या या प्रयत्नांमध्ये संतुष्ट होईन किंवा माझ्याकडून जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट होत नसेल तेव्हा मी निवृत्तीचा विचार करेन. कारण त्यावेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही.”

अश्विनने पुढे सांगितले की, ” मैदानात मला संघर्ष करायला जास्त आवडतो. मी कधीही विजयाचे जास्त सेलिब्रेशन करताना दिसत नाही. मला त्यावेळी नक्कीच आनंद होत असतो. पण ती एक फक्त घटना असते. त्यासाठी तुम्हाला चांगली प्लॅनिंग करावी लागते आणि त्याचबरोबर तुम्हाला अथक मेहनत घ्यावी लागते. या सर्व गोष्टीचे ते एक फळ असते. त्यामुळे ही जी सर्व प्रक्रीया आहे, त्याचा मी जास्त आनंद घेत असतो. माझी गोलंदाजी अचूक आणि भेदक कशी होईल, हे करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. भारताच्या विजयात माझे कसे सर्वाधिक योगदान असू शकते, याचा मी नेहमीच विचार करत असतो. पण जेव्हा माझ्याकडून नवीन काही घडेल असे वाटत नसेल तेव्हा मी खेळ थांबवण्याचा निर्णय घेईन.”

फायनलमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळत नव्हती, तेव्हा अश्विन संघाच्या मदतीसाठी धावून आला. अश्विनने यावेळी न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. पण अश्विन खरंच निवृत्ती घेणार का, हा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here