साउदम्प्टन: फायनलच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा हा बाद झाल्यावर दुर्बिणीतून सामना पाहत होता. त्यावेळी रोहितचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. पण त्यानंतर आता रोहितच्या बायकोने यावर भन्नाट कमेंट केली आहे. रोहितच्या पत्नीने जी कमेंट केली आहे ते वाचून बऱ्याच जणांना धक्काही बसला आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहितने भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली, पण तो ३४ धावांवर बाद झाला. बाद झाल्यावर रोहित शर्मा पेव्हेलियनमधून दुर्बिणीतून सामना पाहत होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे दोघे फलंदाजी करत होते. पण रोहित त्यावेळी दुर्बिणीतून सामनाच पाहत होता की आणखीन काही, यावर आता रितिकाने भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहितचा दुर्बिणीतून सामान पाहतानाचा व्हिडीओ पाहिल्यावर रितिकाने एक कमेंट केली आहे. सोशल मीडियावर रितिकाने म्हटले आहे की, रोहित तु दुर्बिणीतून सामनाच पाहत होतास की आमच्यावर नजर ठेवत होतास.

रोहितच्या या गोष्टीवर रितिकाने ही मजेशी कमेंट केल्याचे पाहायला मिळाले आहे. चाहत्यांनीही या कमेंट्सवर आपल्या मजेशीर कमेंट्स शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला रितिकाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here