मुंबईः ‘काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत आहे, तरीही स्वबळाची भाषा करतोय. यावर () यांनी स्वबळापेक्षा करोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं. इतर सगळेच स्वबळाचे शड्डू ठोकीत असताना शिवसेना गप्प बसणार का?;’ असा रोकडा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या वर्धापन दिनी काँग्रेसला फटाकरले होते. आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य करण्यात आलं आहे.

वाचाः

‘शिवसेनेकडे आत्मबळ आणि स्वबळ आहे. स्वबळ हा शिवसेनेचा हक्क आहे. निवडणुका आल्या की फक्त स्वबळाची भाषा करायची हे बरोबर नाही. मग प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढण्याची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युती तेव्हाही शतप्रतिशत भाजप हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळं एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

वाचाः

‘पश्चिम बंगालमध्ये प्रचंड सरकारी ताकद वापरुनही ममतांचा पराभव करता आला नाही. बंगालची जनता ठाम राहिली व त्यांनी प्रादेशिक अस्मिता काय असते हे दिल्लीश्वरांना दाखवून दिले. महाराष्ट्राने बंगालप्रमाणे वागावे, असाच संदेश उद्धव ठाकरे देत असावेत. स्वाभिमान व अस्मितेच्या मुद्द्यावर ममतांप्रमाणे प्रसंगी केंद्राशी दोन हात करायला तयार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे देत असावेत काय?,’ असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here