शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होतं. भाजपचं ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लिटर पेट्रोल मोफत देण्यात येणार होतं. कुडाळमधील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली होती. त्यावरून राणे व नाईक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. नाईक यांनी नीलेश व नीतेश या राणे बंधूंना मैदानात येण्याचं थेट आव्हान दिलं आहे.
वाचा:
नीलेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुडाळमधी पेट्रोल पंपावर जे झालं ते नाटक होतं. वैभव नाईक यांनी राडा नव्हे तर चिंधीगिरी केली. शिवसेनेच्या वर्धापनदिनी नाईक यांचा कचरा झाला. पोलिसांच्या गराड्यात त्यांना पळून जावं लागलं. ज्या दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं, त्याच दरात वैभव नाईक त्यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल विकतात. मग आंदोलन कसलं? तो एक स्टंट होता आणि तो फसला. नाईक यांनी स्वत:चं हसं करून घेतलं. पक्षही त्यांच्यासोबत नव्हता. वैभव नाईक यांची पात्रता असती तर यांनी त्यांना मंत्री केलं असतं. उद्धव ठाकरेंना नाईक यांची कुवत माहीत असल्यानं दोन टर्म होऊनही नाईक यांना पालकमंत्रीपद दिलं नाही. सरकारच्या आणि उद्धव ठाकरे यांनी टाकलेल्या पैशावर जिवंत असलेला हा आमदार आहे. उधारी पाहिजे होती तर मागून घेतली पाहिजे होती, आम्ही दिली असती,’ असा खोचक टोलाही नीलेश राणे यांनी हाणला आहे.
वाचा:
‘वैभव नाईक हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. पेट्रोल पंपावर अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी तुमची, अशी नोटीस पोलिसांनी बजावली होती. तरी देखील पोलिसांनी काही कारवाई केली नाही. पोलिसांना घेऊनच वैभव नाईक आले होते. याचा अर्थ पोलीस त्याच्यांबरोबर आहेत. कालच्या प्रकरणाला वैभव नाईक जेवढे कारणीभूत आहेत, तितकेच पोलीस जबाबदार आहेत. खासकरून या ठिकाणचे पोलीस निरीक्षक जबाबदार आहेत. नाईक हे पोलीस निरीक्षकांच्या अंगावर धावून गेले तरी पोलीस ते मान्य करत नाहीत. नाईक यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही? आम्ही कोर्टातून न्याय मागू. पोलिसांना देखील न्यायालयात खेचणार,’ असा इशारा नीलेश राणेंनी दिला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times