महाराष्ट्रात नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर येथून घेतलेल्या नमुन्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. रत्नागिरीत सर्वाधिक ५ रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट सापडला आहे. या भागातील अनेक नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे याबाबत तपास सुरु आहे. डेल्टा व्हेरियंटमुळं महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अजून वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Delta-Plus Variant found in Maharashtra)

करोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेचं संकेतही आता मिळायला लागले आहेत. तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणाऱ्या करोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. करोनाच्या या व्हेरियंटला B.1.617.2 असे ओळखले जाते. (Delta-Plus Variant)

डेल्टा प्लस व्हेरियंटचे राज्यात सात रुग्ण; तिसऱ्या लाटेचे संकेत?

महाराष्ट्रात नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर येथून घेतलेल्या नमुन्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. रत्नागिरीत सर्वाधिक ५ रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट सापडला आहे. या भागातील अनेक नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे याबाबत तपास सुरु आहे. डेल्टा व्हेरियंटमुळं महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अजून वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Delta-Plus Variant found in Maharashtra)

तिसऱ्या लाटेचा धोका कितपत?
तिसऱ्या लाटेचा धोका कितपत?

करोना संसर्गच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या तुलनेनं अधिक वाढू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात करोा महामारीच्या पहिल्या लाटेत १९ लाख तर, दुसऱ्या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, या तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रीय रुग्ण (अॅक्टिव्ह रुग्ण) असतील असा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यात १० टक्के मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट
डेल्टा प्लस व्हेरियंट

भारतात करोनाचे जे म्युटेशन सापडलं होतं त्यामुळं करोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाली होती. या म्युटेशनला जागतिक आरोग्य संघटनेनं डेल्टा व्हेरियंट नाव दिलं होतं. पण आता या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाल्यामुळं डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे अद्याप डेल्टा प्लस ‘Variant of Concern’ म्हणजे काळजी करण्याजोगा व्हेरियंट नसल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नाही
अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नाही

डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नसल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळं हा खूप जास्त गंभीर नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डेल्टा प्लसच्या व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या भारतीय लशी किती परिणामकारण ठरतात हे तपासण्यासाठी संशोधनाची गरज असल्याचंही बोललं जात आहे.

म्हणून डेल्टा व्हेरियंट नाव
म्हणून डेल्टा व्हेरियंट नाव

करोनाच्या B.1.617 हा प्रकाराला जागतिक पातळीवर ‘भारतीय व्हेरियंट’ म्हटलं गेल्यानंतर भारतानं १२ मे रोजी याला आक्षेप घेतला होता. विषाणूच्या कोणताही करोना स्ट्रेन / व्हेरियंट कोणत्याही देशाच्या नावाने ओळखला जाऊ नये, असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले. सर्वप्रथम भारतात आढळलेल्या करोना व्हेरियंट B.1.617 या विषाणूच्या प्रकाराला ‘डेल्टा व्हेरियंट’ (Delta Variant) असं नाव देण्यात आले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here