संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथे मूक आंदोलन होत आहे. या आंदोलनात माहविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजप नेतेही उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना छगन भुजबळ यांनी प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी आणि इतर यंत्रणांच्या त्रासामुळेच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, नेते एकनाथ खडसे आणि मला देखील असाच त्रास दिला गेला. मात्र, आम्ही ताकदीने उभे राहिलो, असं सांगतानाच प्रताप सरनाईक यांनी खासगीत उद्धव ठाकरेंसोबत बोलायला हवं होतं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाचाः
‘शरद पवार, आणि सोनिया गांधी जोपर्यंत एकत्र आहेत. तोपर्यंत राज्य सरकारला अजिबात धोका नाही,’ असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, मराठा आरक्षणाबाबत पक्ष जी भूमिका घेईल तीच भूमिका माझी, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचाः
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी, अशी विनंती केली आहे. तसंच, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे शिवसेना पक्ष फोडत आहेत, असा आरोपही केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं राज्यात खळबळ उडाली असून छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times