सिंधुदूर्ग : आंबोलीत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण अल्हाददायक झालेला पाहायला मिळतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन पूर्णपणे बंद असलं तरी देखील सांगली, कोल्हापूर, सातारा, गोवा या भागातील पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काही पर्यटकांना आंबोली पोलीस पुन्हा परतून लावतात तर काही पर्यटकांवर कारवाई करताना पहायला मिळत आहे.

अनेक पर्यटक आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ जाऊन पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. मात्र, पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे पर्यटन व्यवसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. असं असताना पर्यटन व्यवसायिक एक जुलैपासून पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची मागणी करताना पाहायला मिळत आहेत.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील आंबोली, मांगेली, सावडाव हे प्रमुख धबधबे प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात. या धबधब्याकडे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटक पर्यटन स्थळी जाताना पाहायला मिळत आहेत. आंबोली सध्या पर्यटन बंदी लागू केलेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही पर्यटन बंदी लागू असेल. आंबोलीत पर्यटक आले तर त्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई कारवाई केली जाईल.

कोरोनाच्या अनुषंगाने आंबोलीत आलेल्या पर्यटकांवर शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे कारवाई केली जात आहे. आज आंबोलीत दहा पर्यटकांवर कायदेशीररीत्या कारवाई केली असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस बाबू तेली यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here