नागपूरः मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्यासाठी सामान्य मुंबईकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी मुंबई लोकल इतक्यात सुरु होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मेमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असताना मुंबईसह राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे पुन्हा बंद झाली. मुंबईतील करोना रुग्णांची संख्याही आता आटोक्यत येत आहे. तसंच, काही प्रमाणात निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळं लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेनं कधी सुरु होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासंदर्भात आज पालिकेची बैठकही होती. मात्र, त्याआधीच विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं लोकल निर्बंध कायम राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचाः

विजय वडेट्टीवार यांना मुंबईची लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी करोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरु होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ‘राज्यातून करोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही करोनाची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळं स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी करोनाचे नियम पाळावेत,’ असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे.

वाचाः

दरम्यान, राज्य सरकारने करोनानिर्बंध शिथिल करण्यासाठी आखलेल्या पाच निकषांनुसार मुंबई आता पहिल्या गटात पोहोचली आहे. तरीही मुंबईतील निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आलेले नाहीत. एकीकडे लोकल प्रवासावर निर्बंध असल्याने हजारो-लाखो मुंबईकरांच्या नोकरी, व्यवसायावर संकट आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी निर्बंध कमी करण्याची मुंबईकरांची मागणी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here