गडचिरोली : गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 30 जनावरे आणि नऊ जणांची टोळी जेरबंद करण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी, अहेरीच्या चमूला यश आले आहे. नुकतेच रुजू झालेले अमोल ठाकूर यांची अहेरी परिसरात धडक कारवाई सुरू असून आज 10:30 वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे गोवंश तस्करीचे तीन वाहन पाठलाग करून पकडले आहे.

मागील अनेक दिवसांपासून छत्तीसगडवरून महाराष्ट्र मार्गे तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कारभार हाती घेतल्यावर या भागात सुरू असलेले अवैद्य धंद्यांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गोवंश तस्करी करणाऱ्या तीन वाहन पकडून 30 गोवंश जनावरांची सुटका तब्बल नऊ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे.

ही कारवाई आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे वाहनांमध्ये तीन चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून 30 गोवंश जनावरांना गोंडपिपरी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत 30 लाख रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. ही कारवाई अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि त्यांच्या चमूने केली आहे. पुढील कारवाई ते स्वतः करीत आहेत. सदर कारवाईमुळे गोधन तस्करीला आळा बसणार असून तस्करी करणाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे.

छत्तीसगड राज्यातून आष्टी मार्गे तेलंगाना राज्यात गो तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे गोवंशाचे तस्करी करणाऱ्या वाहनाचा अष्टीवरून पाठलाग करीत चौडमपल्ली येथे पकडण्यात आली आहे. तीन चारचाकी वाहन जप्त केले असून तब्बल 30 गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना गोंडपिपरी येथील गो शाळेत पाठवण्यात आले आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे 30 लाख रुपये आहे. एकूण 9 तस्करांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here