दिफ्फा: जेवणासाठी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २० जण ठार झाले आहेत. या मृतांमध्ये १५ महिला आणि ५ बालकांचा समावेश आहे. आफ्रिकेतील देश नायजरमधील दिफा शहरात ही घटना घडली. निर्वासितांसाठी जेवणाचे वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत २० जणांना आपले प्राण गमवावे लागले.

दिफ्फा येथील युवा आणि सांस्कृतिक केंद्रात निर्वासितांसाठी मोफत जेवण वाटप करण्यात येणार होते. यावेळी त्यांना काही पैसेही देण्यात येत होते. या ठिकाणी जवळपास अडीच लाखाहून अधिक निर्वासित आणि विस्थापित झालेले नागरिक वास्तव्य करत आहेत. दिफा पालिकेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रात निर्वासित आणि विस्थापितांसाठी खाद्यपदार्थ, कपडे, तेल आणि पैसे देण्यात येणार होते. याची माहिती समजताच हजारो लोकांना या केंद्राजवळ गर्दी केली. रांगेत उभ्या असलेल्या पहिल्या काहीजणांना वस्तू मिळाल्यानंतर अनेकांना आनंद झाला. मात्र, लवकर या वस्तू मिळाव्यात यासाठी रेटारेटी सुरू झाली. त्या गोंधळात काही महिला आणि लहान मुलं जमिनीवर पडले आणि या गोंधळातच चेंगराचेंगरी झाली.

दिफाच्या राज्यपाल इसा लेमीन यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. नायजेरियाच्या सीमेलगत हा नायजर आहे. नायजेरिया या सीमेलगत या दहशतवादी संघटनेने अनेकदा हल्ले केले आहेत. नायजरमध्ये सध्या एक लाखाच्या आसपास नायजेरियन निर्वासित आहेत.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here