प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याची विनंती पक्षप्रमुखांना केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या आमदार, खासदारांना दिला जाणारा नाहक त्रास हे कारण त्यासाठी सरनाईक यांनी पुढं केलं आहे. युतीच्या नेत्यांचे संबंध अजूनही चांगले आहेत. ते तुटण्याआधी पुन्हा जुळवून घ्या. तसं केल्यास केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारा त्रास थांबेल, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचा:
सरनाईक यांच्या या आरोपांनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. गिरीश बापट यांनी मात्र हे सगळेच आरोप फेटाळून लावले आहेत. ‘सरनाईक यांना भाजपकडून कुठलाही त्रास दिला जात नाही. तपास यंत्रणा केवळ त्यांचं काम करत आहेत,’ असं बापट म्हणाले. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.
वाचा:
शिवसेना-भाजपच्या युतीच्या मुद्द्यावर बापट यांनी आशावाद व्यक्त केला. ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेची युती होती. पुढंही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते सर्वांच्या मनातलं बोलले आहेत. राजकीय जीवनात असं होत असतं. भाजपनं आधीही सांगितलं होतं की शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती आहे. मधल्या काळात काही कृत्रिम लोकांनी ती तोडली. भूतकाळातील गोष्टींबद्दल अधिक बोलण्यात आता अर्थ नाही. पण भविष्यात अशी युती झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल,’ असं बापट यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times