मुंबई : परवडणाऱ्या दरांत विमानप्रवासाची सुविधा देणाऱ्या विमान कंपनीने जाहीर केली आहे. प्रवाशांना आता ३४९९ रुपयांमध्ये परदेशी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. चार दिवसाची ही सवलत आजपासून सुरु झाली असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
प्रवाशांना १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान सवलतीच्या दरात तिकिट बुक करता येईल. या सवलत योजनेसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता २.५ लाख तिकिटे राखून ठेवण्यात आली आहेत. यासाठी प्रवास भाडे ३४९९ रुपयांपासून सुरु आहे.
या योजनेत तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशांना १ मार्च ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येईल, असे कंपनीने म्हटलं आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर हे विशेष प्रवासभाडे इंडिगो प्रवाशांना देणार आहे. सवलत काळातील विमान तिकिटे कंपनीच्या वेबसाइटवरुन बुक करता येतील. या योजनेत प्रवाशांना एकेरी तसेच परतीचा प्रवासासाठी तिकिट बुक करता येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times