रत्नागिरी: जिल्ह्यात या नव्या कोविड विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच जिल्हाधिकारी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या नव्या स्ट्रेनचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्याची माहिती चुकीची असून कुणीही जिल्ह्यात भीती निर्माण होईल अशी कृती करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ( )

वाचा:

नव्या स्ट्रेनच्या बातमीने कोकणात मोठी खळबळ उडाली असताना शासकीय यंत्रणेने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही, असे नमूद करत जिल्हाधिकारी मिश्रा यांनी वस्तुस्थिती समोर ठेवली आहे. तालुक्यातील पाच गावे खबरदारी म्हणून बंद केली आहेत. परदेशवारी करून आलेले रुग्ण त्या भागातील आहेत. प्रशासनाने हे रुग्ण म्हणजे रिसर्च सबजेक्ट (संशोधन विषय) असल्याचे नमूद केलेले आहे. या पाचही गावांची लोकवस्ती एकूण ५ हजार २०० इतकी आहे. त्यांची चाचणी केली असता त्यात केवळ ५० ते ५५ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आम्ही आणखी १०० नमुने बदलत्या विषाणूच्या संदर्भात संशोधनासाठी आयसीएमआर कडे पाठवले आहेत, असे मिश्रा यांनी नमूद केले.

वाचा:

आतापर्यंत ७ नव्हे तर ९ करोनाबाधितांचे नमुने पाठवले असून त्यांचा अधिकृत अहवाल अद्याप शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी सध्या तरी जिल्ह्यात पॅनिक स्थिती निर्माण करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील संबंधित ५ गावांतील ग्रामस्थांसह जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही पाठवलेल्या नमुन्यांबाबत जेव्हा अधिकृत माहिती येईल तेव्हा ती सर्वांना दिली जाईल. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी याबाबत माहिती दिल्याचे माध्यम प्रतिनिधींनी सांगितले असता केवळ नमुने पाठवल्याचे त्यांनी सांगितले आहे, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले असे ते म्हणालेले नाहीत, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यानंतर संगमेश्वर, देवरूख आणि साखरपा भागातील नागरिकांनीही काहीसा सुटकेचा निश्वास टाकला आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here