बुलडाणा : केंद्र सरकारच्यावतीने शेतकरी कायदे 2020 अंमलात आले असून या काद्याविरोधात दिल्ली येथे शेतकरी मागील सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत. केंद्र शासनाने शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावे व शेतकरी बांधवाच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागण्यांसाठी कॉंग्रेसच्यावतीने आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलडाणा जिल्हा किसन काँग्रेसच्यावतीने शेतकरी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने लादलेल्या जुल्मी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप असून या कायद्याविरोधता शेतकरी एकवटला आहे. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली आहे. केंद्र सरकारचे हे शेतकरी कायदे अन्यायकारक असून या काळ्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमांवर मागील 200 दिवसापेक्षा दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 350 पेक्षा जास्त शेतकरी शहिद झाले आहे.

मोदी सरकारने सुरूवातील चर्चेचा देखावा केला, पण तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. शेतकरी कृषी कायदे पारीत करतांना संसदेमध्ये कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला बदनाम करणे, शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविणे असे आंदोलन मोडून काढण्याचे उपाय केल्या गेले. परंतु, शेतकरी आजही ठामपणे मोदी सरकारच्या विरोधात उभे आहे.

केंद्र शासनाने शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावे व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनात बु.जि.कॉ.क. अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, अध्यक्ष गजानन पाटील, मलकापूर आमदार राजेश एकडे, पंचायत राज उपाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, अनु.वि.प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, जि.प.अध्यक्षा मनिषाताई पवार यासह असंख्यकॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here