शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नसल्याने चिडलेल्या शैलेशने गृह विभागाला धमकीचा मेल केला असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ई-मेल आज संध्याकाळी ६ वाजता प्राप्त झाल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला. मात्र कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. मात्र खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा फोन केला होता असे स्पष्ट झाले. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times