रवी राऊत/ यवतमाळ

जिल्ह्यातील मुकूटबन वनपरिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी गुहेच्या तोंडाशी जाळून मारलेल्या वाघिणीच्या शिकार प्रकरणात वनविभागाने शनिवारी पहाटे पाच आरोपींना झरी तालुक्यातील वरपोड येथून अटक केली. मात्र आरोपींना पकडण्यासाठी गावात आलेल्या वनविभागाच्या पथकाने आरोपींच्या घरातील महिलांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करीत गावकरी आज सोमवारी मुकूटबन पोलीस ठाण्यासह वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडकले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ( have alleged that the team beat the )

जिल्ह्यातील मारेगाव आणि मुकूटबन वनपरिक्षेत्रात मार्च आणि एप्रिल महिन्यांत वाघाच्या शिकारीच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी आज शनिवारी पोलीस आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल आठ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत वरपोड येथील नागोराव भास्कर टेकाम, सोनू भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनू तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम यांना पथकाने अटक केली. हे पथक पहाटे ५ वाजता गावात पोहोचले. पथकाम ३०० वनरक्षक व १०० पोलिसांचा ताफा होता. कोणत्याही पुराव्याशिवाय या पथकातील अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियातील महिलांना बेदम मारहाण करून दहशत पसरविली व पाच व्यक्तींना विनाकारण अटक केली, असा आरोप गावकऱ्यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी काही महिलांना पथकातील जवानांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या काही महिलांनी माध्यमांसमोर अंगावरील जखमा दाखविल्या. वरपोड गावात कोलाम आदिवासी समाजाची वस्ती आहे. गावातील नागरिक वन व वन्यजीवपूजक असल्याने ते वाघाची शिकार करूच शकत नाही. या वाघिणीच्या शिकारीसंदर्भात वनविभागास दोन महिन्यांनंतरही कोणताच पुरावा न सापडल्याने वरपोड गावातील निष्पाप व्यक्तींना या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचा आरोप निवेदन मुकुटबन ठाणेदारांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या कारवाई प्रकरणी पांढरकवडा वनविभागासह मुकुटबन वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‍ॅटड्ढोसिटी) गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
जखमी महिलांसह २०० च्यावर गावकऱ्यांनी आज मुकुटबन पोलीस ठाण्यासह वनपरिक्षेत्र कार्यालयात धडक दिली. महिलांना अमानुष मारहाण करणाऱ्यां दोषींवर कारवाई होईपर्र्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलनकत्र्यांनी घेतली. वन विभागाच्या कारवाई विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. वरपोड गावकऱ्यांनी निवेदन दिले. गावात कारवाईच्या वेळी नेमके काय घडले ते चौकशीअंती स्पष्ट होईल, असे मुकूटबन पोलीस ठाण्याचे निरीक्षक धर्मा सोनोने यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
कारवाई टाळण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी वरपोड हे गाव वन्यजीवांच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. हे संपूर्ण गावच वाघाच्या शिकारीत सहभागी असावे, असा आरोप अधिकारी विजय वारे यांनी केला. कारवाईच्या वेळी आरोपींना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही, उलट वन व पोलीस विभागाच्या पथकावर गोटमार केली, असे वारे म्हणाले. गावकऱ्यांनी केलेले सर्वच आरोप निराधार असून, कारवाई टाळण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे वारे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here