मुंबई: मुंबईत संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून सोमवारी मृतांची संख्या सात पर्यंत खाली आली. शहरात करोनाने शिरकाव केल्यापासून संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या १५ हजार ३०५ जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे. ( )

वाचा:

मुंबईत करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत असून मृतांची संख्याही कमी झाली आहे. राज्यात सर्वाधिक १५ हजार ३०५ मृत्यू एकट्या मुंबईत झाले असले तरी दैनंदिन मृतांचा आकडा आता कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ७ रुग्ण दगावले. गेल्या काही महिन्यांतील हा निचांक आहे. सात मृतांपैकी ४ रुग्ण हे सहव्याधीग्रस्त होते. पाच पुरुष तर २ महिला रुग्णांचा मृत्यू झाला. ३ रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होते तर ४ रुग्ण ६० वर्षांवरील होते.

वाचा:

गेल्या २४ तासांत मुंबईत ५२१ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ६८५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत मुंबईत एकूण ६ लाख ८९ हजार ६७५ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. क्षेत्रात आता करोनाचे १४ हजार ६३७ आहेत तर रिकव्हरी रेट ९५ टक्के इतका आहे. १४ जून ते २० जून या कालावधीत कोविड रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्के इतका राहिला असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७२० दिवसांवर जाऊन पोहचला आहे. झोपडपट्टी आणि चाळींमध्ये अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोनची संख्या आता १६ पर्यंत खाली आली आहे तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८३ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा:

करोनाची ताजी स्थिती:

२४ तासांत बाधित रुग्ण – ५२१
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ६८५
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८९६७५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १४६३७
दुपटीचा दर- ७२० दिवस
( १४ जून ते २० जून)- ०.०९ %

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here