मुंबईः मुंबईचे समुद्र किनारे हे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असले तरी सध्या समुद्रामुळं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अरबी समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. १९९० ते २०१९ या कालावधीत घेतल्या गेलेल्या सॅटेलाइट चित्रांचा आभ्यासातून हे समोर आलं आहे. आतापर्यंत १०७ चौरस किलोमीटर इतका भूभाग समुद्राखाली गेला आहे.

नैसर्गिक अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्यामुळं समुद्राची पातळी वाढली आहे. जर अजूनही अशाच प्रकारे हस्तक्षेप वाढत असेल तर लवकरच संपूर्ण मुंबईत पुराचा धोका जाणवेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पर्यायरणातील असंतुलनाचा परिणामही समुद्र, नदी व इतर नैसर्गिक संसाधनांवर होत असल्याचंही अभ्यासातून समोर आलं आहे.

वाचाः

समुद्र किनारी असलेल्या रहिवाशी सोसयट्या व घरे यांना भविष्यात अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळ्यात हे संकट अधिक वाढेल, असंही तज्ज्ञ सांगतात. गेल्या ३० वर्षांपासून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोकण परिसरातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

वाचाः

सृष्टी कंजर्वेशन फाउंडेशननं यावर सखोल अभ्यास केला आहे. ‘समुद्र किनाऱ्यावर होणारे अतिक्रमण आणि संरचनेत बदल यामुळं समुद्रानं भूगाग व्यापला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमीनीबाबत ही बाब ठळकपणे जाणवते. मुंबई आणि ठाण्यातील खाडीच्या जमिनीवर ४५ चौरस किलीमीटर पर्यंतच्या नदी – नाल्याच्या क्षेत्रात दलदल निर्माण झाली आहे. तर, एकीकडे ठाण्यातील खाडीत २४ चौरस किलोमीटरचे क्षेत्रात दलदल निर्माण झाली आहे,’ असं एनजीओचे अध्यक्ष दिपक आपटे यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here